तारे टीमटीमणारे
रंग उधळीत आले
अंधाराच्या या रात्रीला
प्रकाशी करून गेले।।१।।
मन झाले उल्हासित
पाहून काजवे छान
पाहता रंग सोनेरी
विसरून गेले भान।।२।।
किती मोहक दिसते
रंग अनेक पाहता
नाजूक कळ्या फुलल्या
काजवे धरती येता।।३।।
पहा निसर्ग हा कसा
आहे स्वरूपसुंदर
जणू तारेच भेटले
आपल्या या धरती वर।।४।।
मेळा भरला हा छान
सह्याद्रीच्या कुशीमध्ये
जणू वाटते आम्हाला
आम्ही आलो स्वर्गामध्ये।।५।।
चमचमणारे तारे
होते अनेक रंगा
पाहून रंग सोनेरी
भान हरपले मनाचे।।६।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

