
सरत्या वर्षाला देता निरोप
क्षण हृदयी ठेवा गोठवून
वाटचाल नवी चालत
जुने अनुभव मनी साठवून…
संधी आणि आव्हानांना
हातातल्या रेषांनी दिली भेट
निरोप घ्यायचा आनंदाने
नवी स्वप्ने उराशी धरून थेट…
धडपड अपयश आणि यश
सर्वांचे रंग जीवनात भरले
भूतकाळाचे धडे शिकवत
नवे वर्ष स्वागतास उभे राहिले…
आभाळात उडणाऱ्या आशा
जगण्याला वाट दाखवतील
सरत्या वर्षाचा निरोप घेत
स्वप्नांना नवी दिशा देतील…
सरत्या वर्षाला निरोप देता
हरवलेले क्षण विसरुत
नव्या वर्षाचा आश्रय घेऊ
सुख-शांती मनी बाळगूत…
सरत्या वर्षाला निरोप देता
मनात पुन्हा नवचैतन्य भरू
नवा उत्साह नव्या आशा
नव्या वर्षाला आनंदाने स्वीकारू…
कवयित्री संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड














