जीवन संगिनी तू माझी
स्वर्गाची शोभते अप्सरा
साथ तुझी जन्मांतरीची
की भास होतो खराखुरा।।१।।
विश्व तुझे नि माझे
सुंदर असेच फुलावे
नयनातली गोड भाषा
ओळखून तूच घ्यावे।।२।।
जादू तुझ्या प्रेमाची
मनास मोहित करते
जीवन संगिनी मी तूझी
पाहून तुला मी बावरते।।३।।
भाग्य लाभले मला छान
साथ तुझी असे अनमोल
तुझ्या सोबतीने कळाले
खरे माझ्या जीवनाचे मोल।।४।।
जोडी तुझी नि माझी
शोभते ही शिव पार्वती
तुझ्या माझ्या प्रेमाची
अखंड गाजत राहो कीर्ती।।५।।
साथ असावी सदैव
हात हातात असावा
तुझ्या माझ्या या प्रेमाचा
आदर्श नेहमी दिसावा।।६।।
कवयित्री प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

