prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सरत्या वर्षाला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सरत्या वर्षाला निरोप

0
177

जुने वर्ष संपले, नविन आले
नववर्षाच्या नव्या कामना
नवे संकल्प, नविन स्वप्ने
रंगवू नव्या नव्या कल्पना

नविन वर्ष सुखाचे जावो
म्हणता म्हणता सरतात दिवस
तेच संघर्ष, तीच संकटे
त्याच आशा, त्याच निराशा, विरस

जीवन हे हलते झुलते
कधी अंबर, कधी झुंबर
कष्टाला दुसरा पर्याय नाही
तरी जगणे आहे सुंदर

स्वप्ने उद्यासाठी पाहताना
झोकून द्यायचे त्यात स्वःताला
दुसरा कोणी आपल्यासाठी करेल काय
आपणच घडवायचे आपल्याला

ज्यांना कळले जीवन रहस्य
तेच जीवन आनंदाने जगले
बाकी सारे कुढले जळले
जळता जळता संपून गेले

कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here