प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप

0
83

दोन ते तीन दिवसात जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष कव्यात घेण्याचे धाडस करणे गरजेचे आहे. धाडस यामुळे म्हटलं की सरत्या वर्षात खूप काही कटू आठवणी, आणि नवजात जन्मलेल्या बाळांची खुशी ,व आयुष्यातून निरोप घेणाऱ्या नातलग, मित्र परिवार यांच्या दुःखातून सावरण्याची एक जीवापाड केलेली तडजोड होय. कारण आठवणीतून कोणी नाहीसे होणे आणि ते व्यक्ती आता कधीच येणार नाही यांचे दुःख आभाळा इतकं मोठं असतं. ही संगती पुष्कळ लोकांच्या वाट्याला आलेलीच असेल. पण कधीच नको येवो. अशा घटनांना दूरच ठेवणे जरुरी असते पण नकळत येत असतात असो या वर्षात फेरफटका नवनवीन ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जाणे आनंददायक ठरले. कारण आपल्याला आवडणारे काहीही आपणास मिळाले तर तो आनंद म्हणजे गगनाहूनही मोठा असतो. नात्यात छान कार्यक्रमाची गोडी थोडेफार मनस्ताप ,बहिण भावांची काचाबाची, नवरा-बायकोचं टॉम अँड जेरी सारखं भांडण. कारण भांडूनहीं एक दुसऱ्यांच्या शिवाय त्यांना राहावत नाही आणि आई-बाबांचे रागवणे, लाड करणे, मित्र मैत्रिणीच्या गुजगोष्टी त्यांच्यातील वाद परिसंवाद अशा अनेक गोड कटू आठवणी या सर्व सरत्या वर्षाच्या शेवटी यांना निरोप घ्यावाच लागेल. व नवीन वर्ष सर्वांच्या सुख समृद्धीसाठी सोनेरी किरणे घेऊन येईल अशीच शुभेच्छा करेल.

लेखिका रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here