
तूझ्या मोगऱ्याच्या
गजऱ्याची आठवण
अवतीभवती घमघम
छळते का क्षणक्षण
नाजूक पाकळ्या
किती मोहक सुंदर
तुझ्या स्पर्शाचे
ते आठव मनोहर
मनाच्या अलीकडे
पावसाची सर
मनाच्या पलीकडे
आठवणींचे घर
झडल्या पाकळ्या
सुकला गजरा
तरीही अजून का
घमघमतो मोगरा
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा














