लावू झाडे सगळीकडे
पक्षी राहतील आनंदीगडे।।
आज पक्षांना नाही चारा
उडून गेला त्यांचा निवारा।।
रानोमाळ पक्षी फिरतात
मुकाट सगळे सहन करतात।।
पूर्वी कसे होते सुंदर जंगल
राहते होते सगळे मंगल मंगल।।
चिवचिव चिमण्या मस्त दिसायच्या
मुलांच्या सोबत दाणा टिपायच्या।।
आता सर्व आम्ही पाहतो चित्रात
तगमग आमचीही होते मनात।।
सकाळी पोपट मिटुमिटु बोलायचे
पेरूची फोड हळू हळू तोडायचे।।
पाखरांची कुठेही दिसत नाही नक्षी
गेले कुठे हे रानोमाळ पक्षी।।
चला वाचवूया पक्षी सगळे
जगही होईल आपले वेगळे।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

