कोपरगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोपरगाव तालुक्यातील बहुजन भीम पँथर सामाजिक संघटनेचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
उत्सवाला मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे कोपरगाव तालुका पालकमंत्री व जिल्हा संघटक बिपिन गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र निरीक्षक दीपक भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, तसेच अविनाश भाऊ अहिरे,खडांगळे,सुनील मोकळ, पत्रकार विशाल भाऊ लोंढे, सिद्धार्थ मेहेरखांब आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्ना शेख यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वी झाला. तसेच संघटनेचे सहसचिव भारत चक्रनारायण, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता कासम भाई शेख, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबासाहेब मोकळ, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधाकर पाईक, महिला आघाडी संपर्कप्रमुख जयश्री भोसले, अल्पसंख्याक युवा जिल्हाध्यक्ष मुकद्दर खाटीक, आत्माराम हिंगमिरे, तालुका अध्यक्ष अश्विनी वाघ, शाखा अध्यक्ष छाया मोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष साजिद सय्यद, असलम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थी सत्कार
संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायगाव देवी येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक परिवर्तन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, समता व बंधुता यासारख्या विषयांवर उत्कृष्ट निबंध सादर केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा संघटनेच्या वाढत्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक ठळक साक्षीदार ठरला.
संघटनेचे समाजहिताचे कार्य उल्लेखनीय
बहुजन भीम पँथर सामाजिक संघटना ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रबोधन, वंचित घटकांचे सशक्तीकरण आणि संविधानिक मूल्यांच्या प्रचार व प्रसारासाठी सतत कार्यरत आहे. दोन वर्षांच्या अल्प काळातच संघटनेने विविध उपक्रम राबवत समाजात एक नवा विचार जागृत करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. संस्थापक अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने भरीव कार्य केले आहे.भिम आर्मी या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांना दीपक भाऊ भालेराव महाराष्ट्र राज्य निरीक्षक भीम आर्मी यांच्याकडून दलित मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले व भविष्यातही समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
“संविधानाचा मार्ग हा सामाजिक समतेचा मार्ग आहे, आणि हा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी संघटनेची लढाई अविरत सुरूच राहील!”

