prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सन्मान नात्याचा…

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सन्मान नात्याचा…

0
128

सन्मान करायला हवा,नात्यांचा
कुठलेही,नाते असले तरी
मद मत्सर ईर्ष्या द्वेष सोडून
थोरल्या,धाकल्यांचा सन्मान करी।1।

आपणच,जपायचे असते नाते
सगळ्यांना आदरानी वागवावे
नको,रूसवे फुगवे कोणाशीही
आयुष्यभर टिकवून,ठेवावे।2।

नात्यातआपलं परकं काही,नसतं
प्रेमानी जुळवून,असतं घ्यायच
मोठ्यांचा आदर,लहानांस प्रेम
असं गोड जीवन नेहमीच जगायचं।3।

जोपासना नात्यांची,कठिण फारच
खूप धीराने सांभाळावे लागते
एखादा,धागा जरी तुटला तर
जोडणे,नात्याचा धागा अशक्य,वाटते।4।

माणसाचा,जन्म हा, संघर्षच
जपून पावले,उचलावी लागतात
सन्मान,नात्यांचा कराल,तरच
सगळी नाती,टिकून राहतात।5।

कवयित्री सौ. माधुरी हळवे
दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here