
तुझा पाऊस माझा पाऊस
घरात पाऊस बाहेर पाऊस
काळोख पाऊस उजेड पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
पावसात मी, पावसात तू
शांत मी, अशांत तू
घालतो बघ गोंधळ पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
ओंजळीत धरला पाऊस मी
भिजलास तू, भिजले मी
अल्लड पाऊस, मस्तीत पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
अंबरात उडती कितीतरी खग
पंखांवर त्यांच्या पाऊस बघ
ढगात पाऊस नभात पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
हिरवी झाडे हिरवी धरती
काळे काळे ढग वरती
चैतन्याचा झरा पाऊस
तुझा पाऊस माझा पाऊस
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा














