prabodhini news logo
Home कोपरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चास नळी रुग्णालयात घडला मारहाणीचा प्रकार

प्राथमिक आरोग्य केंद्र चास नळी रुग्णालयात घडला मारहाणीचा प्रकार

0
154

दहा हजार रुपयाची केली मागणी

कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मार हानीचा प्रकार आज सकाळी घडला आहे. धामोरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ झगझाप हे शुक्रवार दिनांक 25 रोजी सकाळी रुग्णालयात आले. त्यांच्या हातामध्ये एक आयुर्वेदिक औषधाचा कागद होता. रुग्णालयात जाताच रुग्णालयातील नवीन आलेले जनार्धन बोधाजी गोरे, (हिंगोली जिल्हा) स्टाफ यांना 10.000 रुपये द्या असे म्हणले. त्यांनी स्पष्ट नाकार दिला.
त्यामुळे बाळासाहेब झगजाप यांनी जनार्दन गोदाजी गोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. व त्यांना हॉस्पिटल मधून ओढत आणून डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेऊन मारहाण केली सदर प्रकार हा हॉस्पिटलच्या डॉक्टर व संपूर्ण स्टाफ यांच्या समोर घडला असून त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले. या मारहाणी घटनेची माहिती कळताच गावचे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेऊन बाळासाहेब जगझाप यांना बोलून घेऊन दोन्हीही बाजू ऐकून घेतल्या व पुन्हा असा प्रकार घडू नयेत असे सांगितले. धामोरी येथील बाळासाहेब जगझाप यांची मानसिकता चांगली नसल्याने हा प्रकार घडून आला असे त्यांची बहिणीने व पत्नीने रुग्णालयात येऊन सांगितले. सदर घटनेची माहिती कळताच आमचे पत्रकार त्या ठिकाणी गेले व त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता कुठल्याही प्रकारचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू नसल्याचे निदर्शनास आले. कॅमेरा फक्त चालू पण रेकॉर्डिंग नाही. असेच मारहाणीचे प्रकार वारंवारी रुग्णालयात घडत असतात त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू असणे एक काळाची गरज आहे. सदर मारहाणीची घटना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोलप यांच्यापर्यंत गेलेले आहे. सदर रुग्णालयात स्टाफ साठी काही सिक्युरिटी होते का रुग्णालयामधील सीसीटीव्ही कॅमेरे चालू होत्या की नाही हे बघणे आता गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here