
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
पवनी तालुक्यातील सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे दि.२ ऑक्टोबर २०२५ रोज गुरुवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरडकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण केले.
ह्याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून दोन्ही महात्म्यांचे वर्णन केले व एक बोधपूर्ण नाटिका सादर करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी एक छोटीसी नाटिका सादर करून कचरा व्यवस्थापन कसे करायचे हे पटवून दिले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.















