
प्रेरणा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
गडचांदुर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्पर्धा जरी वाढलेली असली तरी मात्र ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे व प्रयत्नातील सातत्य आहे, ते विद्यार्थी नक्की यशस्वी होतात.त्यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरून यश संपादन करावे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण झालेले मा.शरद शेवाळे यांनी केले. ते युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाशी संलग्नित प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.प्रवीण आंबटकर सर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक मा. शरद शेवाळे सर ( psI) यांनी मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता व विजय अकॅडमी चंद्रपूरचे मा. लक्ष्मण रंगवाड सर यांनी चालू घडामोडी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम , परीक्षाभिमुखता आणि काही ट्रिक्सचा अवलंब कसा करावयाचा याविषयी सखोल मार्गदर्शन मान्यवरांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मार्गदर्शक शरद शेवाळे सर व लक्ष्मण रंगवाड सर यांचा सत्कार करण्यात आला.
संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर मॅडम यांनी तर आभार तन्वी चहाकाटे हिने मानले.















