prabodhini news logo
Home गडचिरोली सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व माता पालक मेळावा...

सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व माता पालक मेळावा सोहळा वार्षिक अंक विमोचन उत्साहात संपन्न

0
78

रामगोपाल अट्टेला
सिरोंचा विशेष तालुका प्रतिनिधी

​सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा ‘ *वार्षिक स्नेहसंमेलन तथा माता पालक मेळावा अत्यंत उत्साहात पार पाडला. या सोहळ्यात शालेय विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करण्यासोबतच यशस्वी माजी विद्यार्थीनिचे सन्मान करण्यात आले.
​विद्यार्थिनींचे बहारदार संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कु. रितीशा कोंडा आणि कु. जेला कोनम यांनी अत्यंत आत्मविश्वासाने केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालनाने उपस्थितांची मने जिंकली.

पाहुण्यांचे आगमन

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिरोंचाचे पोलीस निरीक्षक मा. निखिल फटिंग , मा. मारोती नंदे कु.पी. कुलकर्णी (पोउनि) डॉक्टर.मनोहर कन्नाके तालुका वैद्यकीय अधिकारी, मा. विवेक बनसोड (सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पं.स सिरोंचा) श्रीमती. सुनीता भगत समन्वयक मुक्तिपथ, मा.नुसरत शेख मॅडम नगरसेविका , श्रीमती ललिता माणिकरौतु (शाळा व्य. स अध्यक्षा) किरण वेमूला सामाजिक कार्यकर्ता हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले, मा. नरेंद्र हलामी साहेब नायब तहसीलदार उपस्थित होते. माननीय.हमीद सय्यद (से. नि)नायब तहसीलदार, श्रीनिवास तोटावर (सेवानिवृत्त नायब तहसीलदार) यांच्या विशेष सत्कार, भेट वस्तू प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय.नीलकंठम दोंतुला (गटशिक्षणाधिकारी पं.स.सिरोंचा) केंद्रप्रमुख के.सोमनपल्ली, श्रीरंगी (मुख्याध्यापक मॉडेल स्कूल) के.वाय. जगदाभी शिक्षण तज्ञ तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य केजी बीव्ही, इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थिनींना १० वी, १२ वी बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत, व्यक्तीमध्ये असलेल्या विविध कलागुणांना ओळखून कसं समोर जायचं यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

विशेष उपक्रम आणि पुरस्कार वितरण:

मुख्याध्यापिका मा. एम. एन. साखरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या स्थापना 2011 पासुन आजतागायत शाळेचे उल्लेखनीय कार्य व प्रगतीचा अहवाल सादर केले.
वार्षिक अंक विमोचन विद्यार्थिनी स्व-लिखित लेख, कविता,विचारांचे प्रतिबिंब समाविष्ट असलेले वार्षिक अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आजी-माजी विद्यार्थिनीचा आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कौतुक सोहळा

विद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थिनींच्या गौरव आणि कौतुक करण्यासाठी व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावा या हेतूने त्यांना स्मृतिचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांचे व इतर कर्मचाऱ्यांचे गुणगौरव करून त्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देण्यात आले. त्यानंतर शाळेचे सर्व शिक्षकांकडून **विद्याव्यासंगी, कर्तव्यनिष्ठ, मुख्याध्यापिका माननीय. एम. एन. साखरे मॅडम यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.हे विशेष,

मान्यवरांचे मार्गदर्शन

अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना,माननीय नरेंद्र हलामी साहेब नायब तहसीलदार सिरोंचा यांनी स्पर्धा परीक्षा बाबत मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच इतर मान्यवर एडव्होकेट. फिरोज खान यांनी आदरणीय. मुख्याध्यापिका यांच्या कार्याला सलामी करत झांसी राणी और जिजाऊ जैसे मा असे उपमा देऊन सिरोंचा तालुक्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींसाठी असे काम करणे काही वेगळंच कार्य असून हे शाळेसाठी आणि सिरोंचा वासियांसाठी कौतुकास्पद बाब आहे,असे गौरवोद्गार काढले. माननीय. निखिल फटिंग पोलीस निरीक्षक यांनी येणाऱ्या आगामी वर्ग दहावी आणि बारावी परीक्षा करिता प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थिनींना वेळेचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिले.
आभार प्रदर्शन:
कार्यक्रमाच्या शेवटी कु. शिफा हुसैन मॅडम यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पालक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थिनी, स्वयंसेवक विद्यार्थिनी, स्काऊट गाईड पथक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here