prabodhini news logo
Home ठळक बातम्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने यांना निरोप व हर्षवर्धन...

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने यांना निरोप व हर्षवर्धन पवार यांचे स्वागत…!

0
46

Akola Reporter
Prabodhini News

अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात भेट देऊन माजी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निरोप देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आल्यात.तर विद्यमान जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींदजी दुसाणे यांची औरंगाबाद येथे बदली झाली असून त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळातून पत्रकारांना झालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले‌.नव्या ठिकाणच्या सुलभ आणि यशस्वी सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. नव्याने आजच रूजू झालेले जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धनजी पवार यांचे सुध्दा स्वागत करण्यात येऊन त्यांना सुध्दा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी डॉ.मिलींद दुसाने यांनी साप्ता विश्वप्रभात या वृत्तपत्राचा दर्जा,संपादकांचे स्वतः लिहलेले ताज्या घडामोडींवर संपादकीय लेख आणि ईतर स्वलिखाणाबाबत समाधान व्यक्त करून विश्वप्रभातच्या या उत्कृष्ट दर्जाची माहिती नवे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांना दिली.

यावेळी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, केन्द्रीय सचिव राजेन्द्रबाप्पू देशमुख, उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे, मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ. संतोष हूशे,मनोहर मोहोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here