
नरेश गजभिये
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल 5 जुलै 2023 ला जाहीर करण्यात आला असून ब्रम्हपुरी येथील रोहित(गोलू)रवींद्र तुपटे पास झाला आहे.तो नागपूर परीक्षा सेंटर मधून रोहित चौथा (4) था आला आहे.
रोहित तुपटे याचे वडील रवींद्र तूपटे यांचे मूळ गाव लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली,असून ते ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा ता.ब्रम्हपुरी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
रोहित यशाचे श्रेय शिक्षक, आईवडील आणि रोशन भाऊराव राऊत (सीए) यांना देतो.














