prabodhini news logo
Home ठळक बातम्या राज्यमंत्री व आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जुलै हा दिवस अपंग,...

राज्यमंत्री व आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जुलै हा दिवस अपंग, शेतकरी, अनाथ हे आनंदी दिवस म्हणून साजरा

0
45

संकेत.प बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी

माजी राज्यमंत्री व आमदार तसेच प्रहार अध्यक्ष मा. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जन्मदिन 5 जुलै हा दिवस अपंग, शेतकरी, अनाथ हे आनंदी दिन म्हणून साजरा करतात म्हणून धुळे ज़िह्यात देखील हा दिवस प्रहार अपंग क्रांती स्वस्था, धुळे महिला अध्यक्ष इंदु क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने नेर, ता. जि. धुळे येथील बालाजी लॉन्स मध्ये साजरा करण्यात आला यावेळी मा. संजय जगन्नाथ सैंदाणेच्या मदती मुळे गरीब विद्यार्थी यांना वॉटर बॅग व डबे वाटण्यात आले यावेळी सदरील कार्यक्रम वेळी,ग्राम विकास विस्तार अधिकारी मा. भास्कर सोनवणे, तसेच मा. संगिता सोनवणे या अध्यक्ष म्हणून, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार अपंग क्रांती स्वस्थेचे सहखजिनदार मा.अँड.कविता एस पवार, मा. संजय सोनवणे, मा. शितल चव्हाण, सरला सूर्यवंशी, मा. दिनेश सोनवणे, मा. दिलीप दगडे, मा. प्रमोद महाले, उपस्थित होते. यावेळी मा. नंदू पाटील यांनी गरीब मुलांकडून केक कापून मा. बच्चू कडू यांच्या जन्मदिवस साजरा केला. यावेळी मा. भास्कर सोनवणे व अँड. कविता पवार यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच आभार इंदुताई क्षीरसागर यांनी केले व सूत्र संचालन संजय सोनवणे यांनी केले. सदरील कार्यक्रमास नेरच्या अंगणवाडी शिक्षिका व सेविका, तसेच नेर व लोणखेडीचे दिव्यांग कार्यकर्ते चे मदतीचे अनमोल सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here