
चाळीसगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
सांगवी येथील गौतम अहिरे या तरुणावर काही दिवसांपूर्वी जातीवादी समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला करून जबर दुखापत केलेली आहे.
त्या गुंडांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली म्हणून आम्हाला देखील मारहाण करतील अशी सांगवी गावातील समाज बांधवांच्या मनात भीती होती ती भीती घालवण्यासाठी चाळीसगाव तालुका येथून समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक स्वप्निल जाधव व इतर सामाजिक कार्यकर्ते सांगवी गावात भेट देऊन समाज बांधवांना दिलासा देत. म्हटले की तुम्ही कुठल्याही प्रकारची मनात भीती बाळगण्याचे कारण नाही… तुमच्यावर कुठलाही अन्याय अत्याचार आम्ही होऊ देणार नाही जर कोणी असा अन्याय अत्याचार करत असेल तर अश्या जातीयवादी गावगुंडांना जशाच तसे उत्तर दिले जाईल. ईंट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा समता सैनिक दलाचे स्वप्निल जाधव यांनी दिला.
यावेळी दीपक बागुल,बाबा पगारे, हेमराज अहिरे,गौतम जाधव,राहुल जाधव,किसन जाधव,स्वप्नील चव्हाण सागर निकम,भूषण नवगिरे,गौतम मोरे शुभम मोरे,बाबा चव्हाण,राहुल बेंगळे,शुभम निकम,सोनू आहिरे,गोकुळ आहिरे,राकेश सोनवणे,अक्षय देवरे,आदित्य जाधव,सुनिल सोनवणे,तुषार मोरे तसेच जवळील ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.














