prabodhini news logo
Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्य सिकाई स्पर्धेत चंद्रपूर सिकाई मार्शल आर्ट असोसिएशन चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांची सुयश.

महाराष्ट्र राज्य सिकाई स्पर्धेत चंद्रपूर सिकाई मार्शल आर्ट असोसिएशन चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांची सुयश.

0
120

प्रणय बसेशंकर
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर

सिकाई असोसिएशन ऑफ सोलापूर सिटी अँड डिस्ट्रिक्ट, सलंग्न सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सिकई फेडरेशन ऑफ इंडिया. मान्यताप्राप्त भारतीय शालेय महासंघ (S.G.F.I) महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद , क्रीडा व युवक प्राधिकरण, क्रीडा मंत्रालय भारत सरकार २४ वी राज्यस्तरीय सिकाई अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २३ आणि २४ डिसेंबर २०२३ क्रीडा संकुल, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ८०० ते १००० खेळाडूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्य आणि कांस्य पदके प्राप्त करीत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक केले.
विद्यार्थ्यांचे पुढील प्रमाणे नावे:- एलीन राकेश सुनार – रौप्य पदक, खुशी भोला तेलंग -रौप्य पदक, शकील कलाम अन्सारी – कांस्य पदक, सार्थक राजेश पोलावार- कांस्य पदक, ज्योती राजेशकुमार बाला – कांस्य पदक, अभिनव चंदन चौरसिया – कांस्य पदक शौर्य तूंडूलवार – कांस्य पदक, सुशांत नागुलवार, अभिषेक बुटे, निहारिका आकणुरवार, ओवी डोंगरे, मीत सिडाम, समर खणके, लावण्य लोणगाडगे, पवन कोलभील, उत्कर्ष डवरे, श्रीजीत मनगम या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
संस्थेचे अध्यक्ष मान. तारेंद्र पुरुषोत्तम शेजपाल सचिव संतोष रतन कडपेवाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कोचेस व पालकगण यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here