prabodhini news logo
Home कविता कविता; मेघ दाटूनी आले

कविता; मेघ दाटूनी आले

0
120

मेघ दाटूनी आले
पाऊस पडण्यास मजबूर
उंचावली गगनात मान
बाप चातकासामन आतूर….

एक थेंब पडता भूवरी
आनंद दुमडू लागला
मुखी आनंद पाहूनी मायेने
संध्या गोडधोड हो केला….

पेरणी करीन शेतात
बैलां आनंदाने सांगते
बघता बापाच्या डोळ्यांतून
धार आनंदाची वाहते….

शेकली होती तपन
केवढा होता रे उन्हाळा
तगमग झाली होती जीवाची
नाही पडणार रे पावसाळा….

मेघांच्या येण्याने बापा
जीवनात आली बहार
सांगत फिरु लागला गावा
आहे पेरणीस तैयार….

कवी पुनाजी नारायण कोटरंगे
(रोमनकार)
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here