रमा होती गुणवंत
मोठ्या दयाळू मनाची
शीलवान पावित्र्याची
प्रतिष्ठेच्या धनाची..
भावी जीवनात पतीची
सेवा करणारी गृहिणी
संसाराची धुरा सांभाळून
कर्तव्यनिष्ठ ती कामिनी….
रमाई बा भीमाची पत्नी
केले तिने कष्ट जीवनभर
बाबासाहेबांचे जपून मन
साथ दिली आयुष्यभर ….
रमाई प्रज्ञासूर्याची प्रेरणा
झाली भीमाची सावली
केली मदत संसाराला
अशी होती ती माऊली…
चार मुले मरण पावले तरी
न डगमगली रमा माऊली
खंबीरपणे साथ देवून झाली
भीमरावाची बनली सावली…
नाही केला कधी अट्टाहास
ना मोह कधी दागिन्यांचा
कपाळावरील कुंकू हेच
हेच लेणे सौभाग्याचा…..
प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली


खूप छान 👌🏻👌🏻
रमाईच्या कष्टमय जीवनाची गाथा अधोरेखित करणारी अप्रतिम कविता!