prabodhini news logo
Home कविता कविता- बाप

कविता- बाप

0
173

बाप आभाळा सारखा
त्याला धरतीची माया
नारळाच्या परी बाप
ऊभ्या आयुष्याचा पाया

बाप कष्टाचा पहाड
तसा सोसाट्याचा वारा
नेई एकटा वाहूनी
डोई संकटाचा भारा

बाप विशाल मनाचा
जणू सागराच्या लाटा
आयुष्याच्या अंधारात
चाले तुडवत वाटा

पुणवेच्या चंद्रापरी
बाप शितल चांदणं
सुख दुःखाच्या संसारी
माय बापाचं नांदणं

बाप प्रत्यक्ष जगतो
साधी ठेऊन राहणी
असे प्रत्येक बापाची
एक सारखी कहाणी

कवी- सुभाष मानवटकर निळं पाखरु
हिंगणा नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here