
उकिरड्यावरचे जिणे जगून
चंदेरी दुनियेत आले
बाबासाहेबांचे ऋण एव्हाना
पायदळी तुडविले
उंची वस्त्रे,उंची मनोरे
रेटत बसतो स्वप्न कंगोरे
सोने चांदी मोती आले
त्याच्या उषेखाली
विसर पडतो जयंतीचा
कधी येऊन गेली
गाडी, बंगला, उंच महाल
त्याच्या अंगणी दिसे
समाजाप्रती त्याचे वागणे
प्रामाणिक नसे
काय कामाचा असा माणूस
वेडे वाकडे कारणे सांगतो
समाज कार्याचा आव आणून
समाजाला भुलवितो
विचार करतो रात्रंदिन
जमा किती झाले धन
दिवाळी गणपतीसाठी
असे त्याचेकडे वेळ
बुध्द विहार, बुध्द जयंती
वाटे त्याला खेळ
सच्चा आंबेडकरी लेखक म्हणून साहित्य लिहितो
घरात अपुल्या बायको करवी
गणपती पुजतो
जपून वाग भल्या माणसा
समाजाला दूर सारु नकोस
अन् बाबासाहेबांप्रती
बेगडी प्रेम दाखवू नकोस..
कवयित्री- निर्मला जीवने,नागपूर














