
माय माझी भोळी साधीशी,
सदा संसारात बुडलेली
चिंता तिला लेकरांची,
सायसाखरी स्पर्शाची.
बाप ऊंच डोंगरापरी,
संकटे झेलतो वरच्यावरी,
स्वताचे मस्तक ऊन्हात,
सावली धरतो घरावरी.
थोर माझे मायबाप
देव्हार्यात बसवावे,
त्यांच्यापुढे मी मस्तक नमवावे.
देव राऊळी नांदतो ,
चिंता विश्वाची वहातो,
म्हणुनी काळजी घ्याया लेकरांची,
देव मायबाप देतो.
कवयित्री- अनुराधा जोशी
अंधेरी मुंबई ६९














