
हुबेहुब बापापरी
अक्ष लेकाचा दिसतो
लेकराचा दिपस्तंभ
फक्त बापच असतो
गोड कौतुक लेकाच
बाप डोळ्याने टिपतो
बोट धरून बापाचं
लेक चालाया शिकतो
बाप मायचं आभाळ
कधी गरजते ढग
कधी प्रेम रुपी धारा
कधी पेटलेली धग
बाप संस्काराची वाटी
जणू खोबय्राचा डोल
लेकराच्या आयुष्याचे
कळे बापालाच मोलं
लेक संस्कारी घडावा
सदा बापाला वाटते
लेकराला घडाविण्या
रक्त बापाचंं आटते
जस आईचं काळीज
लेकासाठी कळवळे
आई सारखाच बाप
लेकासाठी तळमळे
जन्मा पासुन लेकाचं
पाहे डोळ्यात भविष्य
स्वप्न साकारण्या बाप
खर्ची घालीतो आयुष्य
कवी- सुभाष मानवटकर (निळं पाखरु)
हिंगणा नागपूर














