रमा होती गुणवंत
मोठ्या दयाळू मनाची
शीलवान पावित्र्याची
प्रतिष्ठेच्या धनाची..
तूच होतीस तारणहार
बा भीमाच्या जीवनी
संसाराची धुरा सांभाळून
कर्तव्यनिष्ठ ती कामिनी….
नशिबी होते किती दुःख
तरी तू कधी ना हरली
बा भीमाच्या स्वप्नांची
तू प्रेरणादायी ठरली ….
रमाई प्रज्ञासूर्याची प्रेरणा
झाली भीमाची सावली
केली मदत बहुजनांची
अशी होती ती माऊली…
चार मुलं काळा आळ गेली
तरी ना खचली रमा माऊली
खंबीरपणे साथ देवून झाली
भीमरावाची बनली सावली…
नाही केला अट्टाहास
कधी लुगडं दागिन्यांचा
कपाळावरील कुंकू हेच
हेच लेणे सौभाग्याचा…..
कवी – प्रा.नानाजी रामटेके (शिक्षक)
ठाणेगाव तालुका आरमोरी,जिल्हा गडचिरोली

