कशे मांडू शब्दात रमाई
तुझ्या कर्तृत्वाचा फुलोरा
त्यागी वृत्तीला भीमाच्या
संसारी सजविला डोलारा …
अंतःकरण रमाईचे मायाळू
अनाथाची झालीस अन्नदाता
हातातील सोन्याच्या बांगड्या
विकून खाऊ घातले तू माता …
गरिबीतही संसार सुखाचा
भीमाच्या शिक्षणास ना बाधा
अशिक्षित रमा शिकली अक्षर
स्वभावही तिचा सीधा साधा…
गरिबीतली सोसूनिया कळ
भोगल्या हाल अपेष्टा यातना
शिलवंत अर्धांगिनी खरोखरी
पूर्ण केली भीमरावाची कामना…
तुझ्या मुळे डाॅ.बाबासाहेब
झालेत बहुजनांचे बाबा
संविधानाची करून पूर्तता
मिळविला संसदेत ताबा…
तुझ्यावाणी कुणीच रमाई
झाली नाही या जगती बाई
रमाईचा आदर्श घेऊन जगावे
जशी झाली बहुजनांची आई …
कवयित्री-कल्पना टेंभुर्णीकर नागपूर

