रमा आईचे जीवन
होते कठीण फार
जीवन होते गरबीचे
कधी ना मानली हार…
बाबा शिक्षण घेण्यास
जेव्हा गेले परदेशात
शांतचित्ताने रमाईने
केली संकटांवर मात….
भीमाच्या पाठीमागे
डोंगर दु:खाचे झेलले
आपल्या मुलांचे मरण
मोठ्या हिमतीने साहिले..
कधी कोणापुढे तिने
नाही पसरले हात
भीमाचे संसारात
कष्ट केले दिन रात….
रमाईचे कष्ट पाहून
बाबास दुःख होई फार
बाबांच्या प्रेमापोटी
हसत सांभाळीले संसार…….
रमा पणती बनून जळली
बाबा भीमाच्या जीवनात
म्हणून आम्ही जगतो सारे
सुख आणि समाधानात…
कवयित्री-लोपामुद्रा शहारे
नागपूर मानेवाडा

