कविता – पाऊस

0
117

काळा कुट्ट आभाळ झाला
झोपली सारी सृष्टी अंधारात
ढगाचे काळे बिंब पसरती
एकमेकांना ढकलत आवेगात /१/

पुढे सरसावण्यात आहे धुंद
भेटण्यास पावसाच्या मस्तीत
ढगांचा आहे नाते पावसाशी
पाऊस पडतो धो धो वस्तीत/२/

इंद्रधनु देत असे हजेरी
शुभ्र मोकळ्या आकाशात
सप्तरंग हे बहरून दिसते
प्रफुल्लीत मन होते उत्साहात/३/

कृष्ण मेघाची वाट पाहती
शेतकरी लहान मोठे सगळे
मातीला सुगंध देऊनी धरती
करी आव्हाहन पावसाने वेगळे /४/

कवियत्री – रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here