आजचा लेख – मैत्री दि. 4/8/24
जीवनात मैत्रीला अनन्य साधारणमहत्व आहे.माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याला जीवन जगत असताना कुणाचा ना कुणाचा आधार असावा लागतो.म्हणून माणूस कुणाशी ना कुणाशी मैत्री करीत असतो. एवढाच नाही तर या पृथ्वीवरील सर्वच सजीव प्राणी एकमेकांशी मैत्री करीत असतात. आणि एकमेकांच्या साहाय्याने आनंदने जीवन जगत असतात.
मैत्री हे त्याने रक्ताचे नसते पण जिवाभावाचे असते. म्हणून मैत्री ही हृदयातून होत असते. मैत्रीत लहान मोठा ,उच्च नीच, गरीब श्रीमंत, काळा गोरा, अशा भेदभाव नसतो .जिथं विचार जुळतात तिथंच मैत्री होते.आणि तीही इतकी घट्ट होते की, दोन जीव एक जान.
मॊत्रीमध्ये कधीच हेवेदावे नसतात. मैत्री ही निखळ असावी लागते. तरच ती टिकते.आणि जर मैत्रीत स्वार्थ आला की मैत्रीत दुरावा निर्माण होतो. म्हणून निःस्वार्थ मैत्री असावी .जशी की राधा -कृष्ण,कृष्ण -सुदाम,कर्ण-दुर्योधन. हे इतिहासात गाजलेल्या मैत्री आहेत. खरा मित्र सुख दुःखात कधीच साथ सोडत नाही. म्हणून माणसाच्या जीवनात मैत्रीला खूप महत्त्व आहे. खरा मित्र आपण पण पुढे जातो आणि आणि मित्राला पण सोबत घेऊन यशस्वीपणे जीवन जगत असतो.
मित्रा हा वण्यव्यामध्ये गारव्या सारखा असतो असे म्हटले जाते..
म्हणून म्हणून आपली मैत्री जपली पाहिजे. मैत्रीत नेहमीच आपण समजून घेतले पाहिजे तरच मैत्री जन्मभर टिकून राहते.
म्हणूनच म्हणतात..
मैत्री असावा हिऱ्यासारखी
सतत चमकत राहणारी
मैत्री नसावी काचेसारखी
क्षणात तुटून जाणारी।
मैत्रीचे नाते हे फक्त विश्वासावर टिकुन राहते त्या विश्वासाला आपण नेहमीच जपून ठेवले पाहिजे.तरच ते नाते छान फुलत जाते. आणि जीवनभर सदैव फुलत राहते.
आज सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
लेखिका – प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

