आजची कविता – तेव्हा माणूस माणसात होता..

1
141

तेव्हा कष्टाला होती किंमत
पैसा त्यामाने कमी होता…
प्रामाणिकतेचा कष्टाळू काळ
तेव्हा माणूस माणसात होता…

संयुक्त कुटुंब पद्धती एकमेव
वडिलधाऱ्यांचा मान मोलाचा…
कष्टाचे सदस्याची खरी कमाई
माणूस माणसाला ओळखायचा…

साधीराहणी आणि साधेपण
सुख दुःखाचा होता आधार…
आदरातिथ्याची पद्धत होती
श्रेष्ठ अनुभव सकल विचार …

संस्कार केंद्राची असे शिदोरी
लहान मुलांची देखभाल होती…
हक्काचे आजी आजोबा होते
संगोपन भावना होती किती…

आपुलकीची भावना होती
शेजारधर्म पाळला जात होता…
सर्वच एकमेकांचे स्नेही होते
तेव्हा माणूस माणसात होता…

केला जात वाकून नमस्कार
अतिथिंचा स्वागत खरा होता..
द्यायचे पाणी पाय धुवायला
तेव्हा माणूस माणसात होता…

कवी – प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी, जिल्हा गडचिरोली

1 COMMENT

  1. विद्रोही कविता
    स्वातंत्र्याची ७७ वर्षे झाली तरीआम्ही
    मात्र जाती धर्मातच बांधून घेतले स्वतःला
    जग चंद्रावर गेले तरी आम्ही मात्र
    कुंडली पाहण्यातच वेळ घालवतोय
    जाती धर्माच्या पलिकडे निघालो की
    धर्माचे ठेकेदार आम्हाला जाऊ नाही देत
    जग संशोधन करत आहे तरी आम्ही मात्र
    पोथी पुराणातच वाहत चाललोय
    जग मन बघून लग्न करत असलं तरी
    आम्ही मात्र जाती धर्मातच गुरफटतोय
    संविधानाने मुलभूत अधिकार दिलेे तरी
    आम्ही मात्र जाती धर्मालाच कुरवाळतोय
    जगाने क्रांती केली तरी आम्ही मात्र
    हिजाब ,बुरखा ,पगडी शेंडी खेळत बसलोय
    अरे कधी होणार आहोत आम्ही माणसे
    काय जाती धर्माची पेरतच राहणार कणसं
    अरे माणसा ऊठ घे हातात संविधान
    आणि घाल सुट बुट

    आयु मा सुर्यकांत कांबळे कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here