आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आदरणीय प्रशांत सर….
दिवस सोनेरी उगवला
आज तुझ्या आयुष्यातला
शब्द फुलांच्या शुभेच्छा देतो
वाढदिवसानिमित्त तुला….
प्रबोधिनी बातमीचा खरा
माध्यम जनजागृतीचा प्रसार
कवितेच्या सोबतीने तुझ्या
करतोस लेखकांचा प्रचार…..
जनसामान्यांच्या व्यथा जाणून
तू होतोस परिचित पत्रकार
बातमीच्या सोबतीने मांडतोस
तू आहेस मात्र बहुरूपी कलाकार ….
नामांकित पत्रकार तुम्ही
करून दाखविले सिद्ध
बेधडक बातम्या लावून
अन्यायाविरुध्द सुरू युद्ध….
नाव आहे आपले प्रशांत
दडले आहे सर्वच त्यात
प्रभावी तुमच्या लेखणीची धार
लाचलुचपतांचा केला घात….
सुख समृद्धी आपणास मिळो
जीवनी व्हाव्यात पूर्ण इच्छा
सारे दुःख कोसोदूर जावोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली

