सोनेरी तुझ्या आयुष्याला
झालर छानशी संपादनाची
घेऊन दखल प्रसिद्धी शब्दांना
लेख,कथा आणि कवितेची
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
आहे तुमची ओळख अशी
वाचकांचेही प्रेम शब्दांवर
बातम्या पोचवता जगभर
साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ
प्रबोधिनी न्युज नेटवर्क तर
मुख्य संपादक ओळख आपली
मा.प्रशांत रामटेके सर!
मृदुभाषी, मितभाषी, प्रफुल्लित
व्यक्तीमत्व तुमचे असे छान
व्यस्तता कामाची आहे मोठी
मिळतो तुम्हाला व्यासपीठावर मान
आयुष्य, आरोग्य लाभू दे,
सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
हीच प्रार्थना देवापाशी
आज आपल्या जन्म दिवशी !
गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

