संपादकीय व्यक्तिमत्व
मा. प्रशांत रामटेके सर
पोहचविता जनापर्यंत
सत्य बातम्या महाराष्ट्रभर
सदैव असतात कामात व्यस्त
अनेक कामे त्यांच्या हातात
प्रत्येक जिल्ह्यातील मीटिंगसाठी
उपस्थिती दर्शविता कार्यक्रमात
विविध कार्यक्रमात असते
वेळ काढून सहभाग छान
निमंत्रित पाहुणे म्हणून
मिळविला व्यासपीठावर मान
कवी कवयित्रींच्या कवितांना
दिली जगभर प्रसिद्धी सरांनी
आमच्या नावाला ओळख दिली
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कच्या वाचकांनी
मनमिळाऊ स्वभाव त्यांचा
बोलण्याची सोजवळ शैली
म्हणूनच अनेक समूहामध्ये
गोड वाणीने मैत्री सर्वांशी झाली
अशा या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला
आज वाढदिवसाच्या देते शुभेच्छा
अखंडितपणे कार्य चालू राहावे
हीच आमची मनोमन इच्छा…
संगीता नागदिवे (सना)
यवतमाळ

