Home कविता आजची कविता माझा भाऊ बळीराजा

आजची कविता माझा भाऊ बळीराजा

0
111

बळीराजा अन्नदाता
माझा भाऊ सोबतीचा
बांधते मी आपुलकीने
धागा तुला प्रेमाचा

दिवस-रात्र कष्ट करून
राबराब राबतो शेतात
भाकरीची चिंता ठेवतो
साऱ्या जगाची मनात

राखी तुला बांधतांना
आठवतो तो इतिहास
कर्ज बाजारांच्या दुनियेत
हाल-अपेष्टा तु सोसतोस

तुझ्या कष्टाच्या हाताला
भाग्य लाभले राखी बांधण्याचा
डोळ्यात तरळते आनंदाश्रू
तू माझा अभिमान असण्याचा

रक्षाबंधनानिमित्त प्रार्थना करते
दीर्घ आयुष्य तुला लाभो
जगाचा पोशिंदा म्हणुनी
जयजयकार तुझा होवो

कवियत्री संगीता नागदिवे (सना)
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here