आला दिमाखात,
झुलवी वशिंड
शिंगाला यांच्या
रंगीत बेगडं.
मुलांचा लाडका,
त्याच्यासंग खेळती.
धरुन दोरी हाती
पुढे त्यांच्या पळती.
कसा दिसे कोरीव,
रंग पिवळा भरला,
दिसे डौलदार
हातात धरला.
सण आहे आज
पुजा करु बैलांची
एक दिवसाचा मोढा
गरज आरामाची.
सौ सुनंदा वाळुंज ठाणे

