prabodhini news logo
Home कविता आजची कविता – स्पर्श आठवांचा

आजची कविता – स्पर्श आठवांचा

0
152

आजची कविता – स्पर्श आठवांचा

स्पर्श तुझ्या आठवांचा
हृदयी दाटून गेला
हळव्या त्या क्षणाला
परत एकदा आठवून गेला…

एकेक आठवण तुझी
नयनी भरून आली
तुझ्या मनाच गुपित
मनी माझ्या पेरून गेली…

साथ सुटली अर्ध्यावर
खेळ तो नशीबाचा
आहेत सोबतीला आठवणी
स्पर्श त्यात सुखाचा…

गुंतता एकमेकांमध्ये
स्वर्गसूख पदरी दिसे
येता विरहाचे क्षण ते
आठवांचे पाणवठे साचे…

मखमली प्रीत ती
बहरली क्षणार्धात
स्पर्श तुझ्या आठवांचा
जपेल मी प्रारब्धात..

कवियत्री
सीमा गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here