आजची कविता – लोकशाही
राज्य आमचेच आहे
येई असे सरकार
मतदान करू आम्ही
घेऊ योग्य उमेदवार!!१!!
आम्हा नेता हवा छान
असे समस्यांची जाण
लोकांच्या हितासाठी तो
जीवन करी कुर्बान!!२!!
वाढली किती बेकारी
कामच नाही कुणाला
नेता येतो आणि जातो
पुसत नाही जनाला!!३!!
पण हे लोकशाहीत
नाही असे घडणार
करू मतदान आम्ही
लोकशाही जपणार।।४।।
लोकशाहीत नको हे
भ्रष्टाचारांची ही खाण
सुखी जीवन लोकांचे
नेहमी राहावे छान।।
हक्क आणि कर्तव्ये
दिले बाबासाहेबांनी
त्यांच्या कष्टाने आज
चवदार शुद्ध पाणी!!६!!
कवियत्री
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

