prabodhini news logo
Home कविता आजची कविता – मतदान

आजची कविता – मतदान

0
125

मतदान करावे सारे
हा आहे मानव अधिकार
मतदानानेच होतो देशाच्या
भवितव्याच्या घडणीचा आकार

कळावे अन कळवून द्यावे
मताचे महत्त्व साऱ्यांना आधी
वाया घालवू नये कोणी
ही धडपड नाही साधी

एका मताने काय होईल?
विचार करू नये कधी
हा एकच मत आहे जनतेचा
इथे भेद नाही मत द्यावे आधी

मतदानाचे महत्त्व पुढच्या ५ वर्षाचे
भवितव्य विचार करावे अन मत द्यावे
उजळेल देशाचे भविष्य या मताने
मत द्यावे सारे देश प्रगती कडे न्यावे

कवयित्री रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here