
आपले भारतीय संविधान
असे एकमेव राष्ट्राचा प्राण…
मानवी हक्काची जोडत्री
असे सदैव आम्हां अभिमान…
करावा आत्म स्वीकार सर्वांनी
लोकशाही मूलभूत तत्त्वांचा…
गजर अधिकार मतदानाचा
न्याय व स्वातंत्र्य बंधुत्वांचा ….
मतदार राजा जागा तू हो
नाही अधिकाराची कमी…
जुळे लोकशाहीचा धागा हो
संविधान स्वातंत्र्याची हमी …
संविधान शाश्वत विकास सत्य
भारताची अखंडता कायम ठेवू…
संविधान आपली जबाबदारी
योग्य उमेदवारास निवडून देऊ…
मतदानाची किंमत ती अमूल्य
सार्वभौम जनतेचे स्व चिंतन…
कायम ठेवू अपेक्षा वास्तव
पात्र उमेदवार देऊ निवडून…
प्रजासत्ताक – लोकांची सत्ता
महिलांना मिळता रोजगार…
सर्व भारतीयांनी करावे मान्य
संविधान एकमेव सुविचार…
मतदान आपला अधिकार
साधू शकतो देशाची प्रगती…
एक मत किंमतीचा ठेवा
आहे सार आपुल्याच हाती….
कवी प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली














