बाई सावित्रीचे मी
किती गावू गुणगान
स्त्री उन्नतीसाठी
तीने त्यागीले जिवन
माझी माय गं सावित्री
तीला लाख लाख प्रणाम
नवा जन्म तीने दीला
हाती घेवून कलम
दीन दलितांच्या कल्याणा
तीने पेलली आव्हाने
आणि घडवली क्रांती
सारी तुटली बंधने
माझ्या सावित्री सारखी
कोणी दुसरी नाही आता
तीने ज्ञानदिवा लाविला
तीच विद्येची देवता
कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड

