सोनेरी दिवसांची सोनेरी पहाट..!
आधीची रात्र जशी आमवश्या, शेतात पाणी
भरण्या झाली, भुताची भेवाट..!!
डुकरानीं केली ऊस पिकाची नसाट..!
राहिले खाली फक्त पाचट..!!
हरवूनी रात्र वेडी पाहे पहाट..!
शोधूनी मिळता पहाट..!!
येऊ रविवारी उठूनी सकाळी एक सोनेरी पहाट..!
सुदंर सोनेरी पहाट सोबत पक्षाचा किलबिलाट..!!
सकाळी सकाळी जाऊ शेतात हिरवं रान आणि
चिव चिव चिमण्या चा गोंघाट..!
गेला कालचा दिवस गेल्या निराश्या
झाली आता नवी उमेद घेऊन पहाट..!!
नका लावू आता गाणं ते झिग झीगाट..!
आता द्यावे पिकाला पाणी ,
नाही तर होईल पीक सपाट..!!
द्यावे आळस सोडून उठावे लवकर
होण्याआधी पहाट..!
दिवसभर राहावे मन प्रसन्न,
सकाळी कोवळ्या उजेडत..!!
सोनेरी दिवसांची सोनेरी पहाट..!!!
कवी – एकनाथ डी पाटील

