prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री

0
144

मनात माझ्या असते द्वंद
तेव्हा दिसतोस तू
सुख असो वा दुःख
खळखळून हसतोस तू…

का घालतोस उखाणा
शब्दात अडकतोस तू
उन येता दारात माझ्या
फांदी होऊन वाकतोस तू…

आहेस जिथे तिथे
मुठीतले मधुर क्षण वेचतोस तू
मी सागर, मी आकाश
क्षितिजरेषेसारखा भासतोस तू

मैत्री कशी असावी
याचे उदाहरण म्हणजे तू
निस्वार्थ भावनेने संकटकाळी
नेहमीच साथ देतोस तू..

हाय रे मित्रा!
तुझ्यासारखाच फक्त तू
जीवनात माझ्या
आहेस किती खास तू….

गुलाब अनिल वेर्णेकर:गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here