
श्रावण सरी बरसता
सण आला रक्षाबंधनाचा
पावित्र्याच्या नात्याचा
की संपन्न संस्कृतीचा.
अतुट नाती ही
तुटत नाही कधी
विश्वासाचे प्रेम हे
वाहते दूर तक जशी नदी.
रेशीमगाठ बांधूनी हाती
निश्चिंत होतो मनोमनी
दीर्घायुष्य लाभो भावाला
प्रार्थना ही ईश्वराच्या चरणी.
नको भेटवस्तू
नको पैसा रुपया
तुझ्यासाठी भाऊ
सर्व प्रेमानी जगू या.
औक्षण करूनी
हर्ष होतो सणासुदीला आता
परतुनी ये घरी परत तू
प्रेमळ बंधू माझा.
सौ.वर्षा साठे शिंत्रे
पणजी गोवा















