लोकशाही भारताची
आहे आन,बान, शान
राखावेच समस्तांनी
जबाबदारीचे भान …. १..
कर्तव्याचे राहो सदा
जनसामान्यास भान
जबाबदारीने वागा
सांगे घटनेचे पान …….२….
लोकशाही विकासाचा
आहे बिलोरी आरसा
जपलाय खरा तिने
शाहू फुलेंचा वारसा ……३…..
रयतेच्या सन्मानार्थ
शस्त्र चढविते करी
वठणीला आणायास
हात घटनेचा धरी …. ४….
निवडुनी अनुयात
लोकप्रतिनिधी खरे
लोकशाहीतूनी देश
वाट प्रगतीची चढे … ५….
सौ. आरती प्रवीण नागपुरे
अमरावती

