बाबासाहेबांच्या सोनेरी स्वप्नांना
तूच साकार केलेस माता रमाई
बा भीमाच्या धारदार लेखणीची
तू होत होती पेनाची निळी शाई ..
जीवनाच्या काटेरी वळणावर
खंबीरपणे वाट तुडवीत होतीस
आले किती तुझ्या पदरी दुःख
दुःखांना सारून हसत राहिलीस
नव्हता पुरेसा औषधाला पैका
लेकरं बिन उपचाराने मुकली
मुलं सोडून गेली डोळ्यासमोर
कणखर तू कुणापुढे ना झुकली
बाबासाहेबांच्या कठीण काळात
खंबीरपणे पाठीशी उभी राहिली
जगावे समाजाची लेकरं म्हणून
सुखी संसाराची स्वप्ने त्यागली..
तुझ्या अश्रूंनी जडलेल्या मातीला
मिळाले बहुजनांना रूप सोन्याचे
कितीही जन्म घेतला आम्ही जरी
कसं ऋण फेडू तुझ्या उपकराचे
दया करुणा ममतेची माऊली
झाली असंख्य लेकरांची आई
संविधान निर्माता देवून पदरी
जगी महान माता ठरली रमाई
कवयित्री-माला मेश्राम
नेरुळ नवी मुंबई

