भूतलावरती देव
वावरते सदा माय
घेते काळजी सर्वांची
लंगड्याची आहे पाय…१
प्रत्येकास प्रेम देते
लेकरास देते माया
माय जिव्हाळा लावते
राब राबवून काया ….२
जगी ममतेने सदा
मन सर्वांचे राखते
कुठल्याही लोभाविना
नित्य संसार करते….३
कष्ट करून अपार
आई माझी शिल्पकार
दिले जीवना आधार
केले स्वप्नांना साकार….४
कसे जगावे जगात
रोज सांगे मला मर्म
कष्ट करूनी दावीते
करा सदोदित कर्म….५
काय वर्णावे महिमा
आई देते मला ज्ञान
नको करू अपमान
नित्य गावे गुण गान…..६
कवी : नागेश बोंतेवाड
छत्रपती संभाजीनगर

