कविता – आई

1
395

माया – ममता मातृत्वाने…
ओथंबलेली प्रेमळ व्यक्ती,
म्हणजे आई.

या स्वार्थी जगामध्ये ,
एकमेव निस्वार्थी व्यक्ती…..
म्हणजे आई .

बोलतानाही शब्द अपुरे पडावे,
जितके बोलावे तितके कमीच वाटावे…
अशी जिची ख्याती,
ती म्हणजे आई.

दहा हत्तीचे बळ जिच्या पंखामध्ये…
सारे आकाश कवेत घेण्याची ताकद तिच्यामध्ये ,
अशी बलाढ्य व्यक्ती म्हणजे आई .

जिच्या असण्याने आहे ,
जीवनाला खरा अर्थ
तिच्याविना आहे सारे व्यर्थ .

नाही तिच्या मातृत्वाला कशाचीही तोड,
अशी आहे आई माझी गोड

कवियत्री प्रांजल प्रकाश एटम
सांगली

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here