लेख – मन जणू आरसा

0
25

मन हे आरश्याप्रमाणे असते. स्वच्छंद, पारदर्शी, आरपार, मनात काही न ठेवणारे, जसे आरशावर पडलेला डाग लगेच दिसतो तसेच मन ही असते. मनात काही आडपडदा नसतो.खूपदा आपले मनातले भाव चेहऱ्यावर येत असतात.एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की मन खट्टू होते. त्याचे प्रतीसाद चेहर्यावर दिसतात. चेहरा आपली मनाची अवस्था सांगतो. आरशाला लगेच चेहरयाचे भाव कळतात आपले मन आनंदी आहे का दुःखी ते आरसा सांगतो.

असे म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे. मन हे चंचल असते. आपण सतत आपल्या मनाचे ऐकत असतो.केव्हा कोणी व्यक्तीने आपल्याला काही वाईट गोष्ट करावयास सांगितले तरीही आपण आपल्या मनाचेच ऐकतो. पण केव्हा केव्हा मनाने घेतलेले निर्णय हे चूकीचे ठरतात आणि आपल्या आयुष्याची वाताहत होते. आयुष्यभर त्या चुकीच्या निर्णयामुळे अपराधी भावना माणूस जगत असतो. या अपराधी भावनेतून निराशा येत असते. माणूस निराश होत असतो, जे सकारात्मक विचार करणारे असतात ते या निराशेच्या गर्तेतून बाहेर निघतात. पण जे नकारात्मक विचार करणारे असतात ते या निराशेतून बाहेर येत नाही, आणि मग आत्महत्याचे विचार चक्र त्यांच्या डोक्यात चालू होते. म्हणून सदैव सकारात्मक असावे म्हणजे आपले मन ही सकारात्मक होते.

लेखिका – रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here