दिप अमावस्या झाली
अन् श्रावण सुरू झाला
सणावारांची बरसात आली
पहिला सण नागपंचमीचा आला
रविवार पुजले बायकांनी
मुठ वाहिली शंकराला सोमवारी
उपासतापास व्रतवैकल्ये
सुरू झाले प्रत्येक वारी
हिरवा शालू नेसून
सृष्टी सजली सजली
शेती बहरली बहरली
कणसे डुलू लागली
ऊन पावसाचा खेळ
श्रावणात सुरू झाला
विहिरी भरल्या काठोकाठ
नद्यांनाही पूर आला
श्रावणाची गंमतच न्यारी
गोडाधोडाचा नैवेद्य भारी
नटला सजला श्रावण महिना
परी कधी न येई असा महिना
कवियत्री – रेखा डायस
गोवा

